*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानाला सुरुवात*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान केंद्रावर सुरू करण्यात आली. कणकवली तालुक्यातील 165 मतदारांचे मतदान कणकवली तहसीलदार यांच्या दालनात मतदान केंद्रावर होणार आहे. याकरिता कणकवली तहसीलदार आर जे पवार यांची मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडणार असून, गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून रंगलेले राजकारण आणि त्या अनुषंगाने घडत असलेल्या वेगवान हालचाली या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मतदान केंद्रापासून 100 मीटर च्या बाहेर बुथ लावण्यात आले आहेत. भाजपकडून सिद्धिविनायक सहकार पॅनल तर महाविकासआघाडी कडून सहकार समृद्धी पॅनल च्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यांमध्ये मतदान केंद्र असणार असून, त्या ठिकाणी त्या – त्या तालुक्यातील मतदारांचे मतदान होणार आहे.

