*कोकण Express*
*यारा फाऊंडेशन मार्फत मोफत अगरबत्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
व्यवसायिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या यारा फाउंडेशन या संस्थेमार्फत मोफत व्यावसायिक अगरबत्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी, 2022 आहे. यारा फाउंडेशन ही संस्था कौशल्य विकास प्रशिक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात येते. तसेच विविध प्रकारच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही संस्था कार्यरत आहे. या प्रशिक्षण शिबिरात शिबिरार्थींना प्रशिक्षणासोबत मार्केटिंग विषयीदेखील मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या मोफत प्रशिक्षण शिबिराचा फायदा इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन याारा फाऊंडेशन मार्फत करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा. यारा फाऊंडेशन- 9421024240 / 8530428240 / whatsapp- +91 97634 35712