नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना पदाधिकार्‍यांची पोलिसांत फिर्याद

नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना पदाधिकार्‍यांची पोलिसांत फिर्याद

*कोकण  Express*

*नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना पदाधिकार्‍यांची पोलिसांत फिर्याद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे विधानसभा संघटक सचिन सावंत आणि युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड यांनी कणकवली पोलिस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यात संतोष परब यांच्यावरील हल्ल्यातील आरोपी नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा ठावठिकाणा राणे यांना माहिती आहे आणि ते आरोपींना पोलिसांनी पासून व अटकेपासून वाचविण्यासाठी आसरा देत आहेत किंवा लपवत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही सचिन प्रकाश सावंत रा . कणकवली जळकेवाडी, राजू नरेश राठोड रा . कलमठ बिडयेवाडी आम्ही शिवसेना पक्षाचे काम करत आहोत. दि . ३०/१२/२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदान होणार आहे त्याचा मी प्रचार करीत आहे. दि . १८/१२/२०२१ रोजी आमच्या पक्षाचे श संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला त्याबद्दल मला माहिती असून सदर गुन्ह्याच्या पोलीस तपास करत आहेत. तसेच सदर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हे आमदार नितेश राणे व गोट्या सावंत आहेत. असे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. असे मला प्रसारमाध्यमातून समजले आहे. २८/१२/२१ रोजी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी कणकवली येथे एक पत्रकार परिषद घेतली. सदर पत्रकार परिषद मी वृत्तवाहीनीवर पाहिली आहे तसेच वर्तमान पत्रात वाचली आहे. सदर पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांना नितेश राणे हे कुठे आहेत ? या एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ” ते कुठे आहेत हे सांगायला मी काय मूर्ख आहे का ? ” असे उत्तर त्यांनी दिल्याचे आम्ही पाहिले. तसेच वर्तमान पत्रात वाचले आहे. यावरून आमचा हा ठाम विश्वास आहे कि, नारायण राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्यातील आरोपी नितेश राणे व गोट्या सावंत यांचा ठावठिकाणा माहिती आहे. तेच स्वतः सदर आरोपींना पोलिसांपासून व अटकेपासून वाचविण्यासाठी आसरा देत आहेत किंवा लपवत आहेत. म्हणून आमची नारायण तातू राणे यांच्याविरोधात फिर्याद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!