*कोकण Express*
*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून चौकशीची नोटीस?*
*सूत्रांकडून मिळाली माहिती…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे कुठे आहेत या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे कुठे आहेत ते सांगायला मला मूर्ख समजला का? असा सवाल उपस्थित केला होता. त्या अनुषंगानेच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते!