कणकवली पोलीस निरीक्षकांच्या विरोधात प्रदीप मांजरेकरांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या

कणकवली पोलीस निरीक्षकांच्या विरोधात प्रदीप मांजरेकरांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या

*कोकण Express*

*कणकवली पोलीस निरीक्षकांच्या विरोधात प्रदीप मांजरेकरांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या…*

*वागदेतील झुगार अड्ड्यावर कारवाई न केल्याचा आरोप*

*पालकमंत्री व गृहमंत्र्यांचे वेधले होते लक्ष…*

*ओरोस ः प्रतिनिधी*

कणकवली पोलीस निरीक्षकांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीन दिवसांचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तक्रार करूनही वागदे येथील झुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना सादर केलेल्या निवेदनात वागदे येथील साईबाबा सोशल क्लब जुगार अड्ड्यावर कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई बाबत ३० ऑक्टोबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी साईबाबा सोशल क्लब वागदे येथे स्पर्धा आयोजीत केली होती . या ठिकाणी जुगार चालतो. या बाबत आपण ८ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्याकडे तक्रार केली होती. या स्पर्धेला कणकवली पोलिस स्टेशनचे अधिकारी सागर खंडागळे व शरद देठे पोलिस गणवेशात उपस्थित होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वागदे सरपंच यांनी सदर क्लबबाबत तक्रार आपल्याकडे तसेच कणकवली पोलिस ठाणे व कणकवली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या क्लबमुळे अनैतिक धंदे वादविवाद तसेच गावात शांतता बिघडेल असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर तहसीलदार कणकवली यांनी वागदे मंडळ अधिकारी यांच्यामार्फत अहवाल मागवला होता. त्यात मंडळ अधिकाऱ्यांनी सदर क्लब पासून गावातील तरुण युवकपिढींना कोणालाही त्रास होणार नसल्याचे क्लब मालकाने लिहून दिले असले तरी रमी व्यतिरिक्त वागदे येथील क्लबमध्ये कोणाताही खेळ चालू स्थितीत आल्याचे दिसून आलेला नाही, असे म्हटले आहे

रमी हा खेळ तेथे पैशाने खेळला जातो, असे अवहालात नमूद करतानाच तो कसा खेळला जातो. किती पैसे लावून किती पैसे मिळतात ? याची माहिती दिली आहे. यातून या ठिकाणी जुगार चालतो असे मान्य केले आहे, असे असताना पोलीस कारवाई करीत नाहीत. येथील पोलीस अधिकारी हप्ता घेतात, असे ऐकिवात आहे. कणकवली पोलिसांनी छापा टाकला परंतु अगोदरच माहिती मिळाल्याने काही मिळू शकले नाही . त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? हे शोधले पाहिजे. सध्या या अवैध धंद्यामुळे कणकवली तालुका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!