केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित पॅनल जिल्हा बँकेत विजयी होईल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित पॅनल जिल्हा बँकेत विजयी होईल

*कोकण Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित पॅनल जिल्हा बँकेत विजयी होईल…*

*माजी आमदार प्रमोद जठार यांचा विश्वास…*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

जिल्हा बँकेत केंद्रीयमंत्री उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत पॅनेल विजय होणार असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे. केंद्राच्या अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवूया. त्यामुळे सर्व मतदारांनी भाजपाप्रणीत उमेदवारांना मतदान करा असे आवाहनही श्री. जठार यांनी केले. वैभववाडी भाजपा कार्यालयात माजी आमदार प्रमोद जठार यांची पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा भालचंद्र साठे, विनायक रावराणे आदी उपस्थित होते. यावेळी जठार यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे, पवार आणि गांधी यांचे नाव मोठे आणि लक्षण खोटे अशी अवस्था झाली आहे. हे सरकार म्याव म्याव मध्ये वाहत चालले आहे. पायरीवरील विषय पायरीवरच संपले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पायऱ्या सांभाळायला हव्यात .

अजित पवार कोण? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला त्यात काय चुकले. बँक चालवायला अक्कल लागते. असे अजित पवार जिल्ह्यात येवून बोलतात. मग कपाळावर बक्कल कोणतरी मारणारच. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे पवार आज राज्याचे पालक आहेत. पण आगीत तेल ओतण्याचे काम अजित पवार यांनीच केले. असा घणाघात जठार यांनी केला. भाजपा आणि सेना यांना मारामारीत गुंतवायचे आणि यांनी मजा बघत रहायची. असे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे षडयंत्र आहे. अशी टीकाही जठार यांनी केली.

राणे समर्थक म्हणून चेअरमन पदावर असताना आपण कोणतीही चुकीची गोष्ट केली नाही असे सतिश सावंत सांगत आहेत. म्हणजेच राणे साहेबांनी कोणतीही जबरदस्ती तुमच्यावर केली नाही हे देखील सावंत यांनी मान्य केले पाहिजे. असे जठार यांनी सांगितले. जिल्हा बँकेकडे ठेवीदार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु त्याचा उपयोग बाहेरच्यांना जास्त होत आहे. कर्ज घेणाऱ्यांची जिल्ह्यात संख्या खूपच कमी आहे. असे जठार यांनी सांगितले. केंद्रात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अमित शहा यांचे मजबूत सरकार आहे. उद्योग मंत्री नारायण राणे हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँके असेल तरच सर्व योजना प्रभावीपणे आपण राबवू शकतो. बँकेवर भाजपाचा झेंडा फडकणार म्हणून सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे विषय भलतीकडे नेत आहेत. विधिमंडळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी विषय, आरोग्य हे गंभीर विषय असताना पायरीवर झालेल्या विषयात सरकार गुंतून आहे. अशी टीकाही जठार यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!