भाजपा आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

भाजपा आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

*कोकण  Express*

*भाजपा आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी…*

*सिंधुदुर्ग*

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या २९ डिसेंबर रोजी दुपारी निकाल दिला जाणार आहे. आज अटकपूर्व जामिनावर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुनावणी झाली. नितेश राणेंच्या वकिलांचे आपले युक्तिवाद केला. सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण न झाल्यामुळे उर्वरित सुनावणी उद्या २९ डिसेंबर रोजी दुपारी झाल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे अटकपूर्व जामीनाबाबत निर्णय देतील. तूर्तास तरी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन बाबत आज निर्णय लागला नाही. अटकपूर्व जामीन फेटाळला गेला असता तर नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार होती.

सरकारी पक्षातर्फे वकील प्रदीप घरत, वकील भूषण साळवी यांनी काम पाहिले. तर नितेश राणें यांच्या वतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. उमेश सावंत, ऍड राजेश परुळेकर, ऍड अविनाश परब, ऍड प्रणिता पोटकर यांनी युक्तिवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!