आम.नितेश राणेंना बेल मिळणार की जेल?

आम.नितेश राणेंना बेल मिळणार की जेल?

*कोकण Express*

*आम.नितेश राणेंना बेल मिळणार की जेल?*

*संपूर्ण महाराष्ट्राचा लागलय लक्ष*

*सिंधुदुर्ग :*

संतोष परब यांच्यावर जो हल्ला झाला तो आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून झाला आहे, यासाठी नितेश राणे यांना अटक झाली पाहिजे अश्या प्रकारची भूमिका संतोष परब आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी सुरू आहे.

यावेळी त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तब्बल १ तास युक्तीवाद केला. यात त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत बोट ठेवले. जे आरोपी पकडले त्यांची नावे प्रसारमाध्यमांना देखील देण्यात आली नव्हती. मात्र आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे आरोपी म्हणून बाहेर पडली. घटना घडून बराच कालावधी झाला होता मात्र नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून जे काही बोलले त्याचा राग मनात ठेवून त्यांच्यावर सुडाच राजकारण केले जात असल्याचा युक्तिवाद वकील संग्राम देसाई यांनी केला.

सरकारी वकिलांचा अजून युक्तिवाद बाकी आहे. यानंतर नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळणार की अटक होणार हे स्पष्ट होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!