सिंधुदुर्ग’चे नवे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे रुजू

सिंधुदुर्ग’चे नवे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे रुजू

*कोकण  Express*

*सिंधुदुर्ग’चे नवे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे रुजू…!*

*जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय भडकवाड यांनी केले अभिनंदन…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून शंकर बर्गे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय भडकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.

मावळते अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची बदली वेतन पदोन्नतीवर झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. आज हिंगोली येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले शंकर बर्गे यांची सिंधुदुर्गचे नवे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. आज सकाळी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला सहकुटुंब सिंधुदुर्गात दाखल झालेले शंकर बर्गे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली रत्नागिरी एमआयडीसी येथे झाली होती. एमआयडीसी मुख्याधिकारी पदोन्नती नंतर त्यांना गेल्या तीन वर्षांपूर्वी शासनाने हिंगोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली होती.

गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या शासनाच्या या बदल्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त झालेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर शंकर बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय भडकवाड व त्यानंतर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी त्यांचे स्वागत केले.आज पदावर विराजमान झाल्यानंतर महसूल कर्मचारी संघटना व विविध संघटनांनी त्यांची भेट घेऊन स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!