*कोकण Express*
*नितेश राणेंच्या ‘त्या’ कृतीचे समर्थन नाही… मात्र नितेश राणेंना कटात अडकवला तर स्वस्थ बसणार नाही…*
*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस*
*सिंधुदुर्ग*
आम. नितेश राणे यांच्या त्या वर्तणुकीचे आम्ही समर्थन करणार नाही. मात्र त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं विरोधकांनी ठरवलं असेल तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्याविषयी दाद मागण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. याचा आम्हाला आनंद नाही. कारण या सभागृहाच्या वर न्यायालयाचा अधीक्षक व्हावा, या मताचे आम्ही नाही. या सभागृहात कायदा पाळला जात नाही. संविधान पाळले जात नाही. आमच्या सदस्याच्या वागणुकीचे आम्ही समर्थन करत नाही. त्याला आम्ही जाब विचारू. मात्र सभागृहाबाहेरील विषय सभागृहात आणून नितेश राणेंना अडकविण्याचा सरकारचा कट असेल, तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना केला आहे.