नांदगाव प्रिमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा महापुरुष बेळणे ठरला मानकरी

नांदगाव प्रिमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा महापुरुष बेळणे ठरला मानकरी

*कोकण Express*

*नांदगाव प्रिमियर लीग क्रिक्रेट स्पर्धेचा महापुरुष बेळणे ठरला मानकरी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यतील नांदगाव येथील नांदगाव प्रीमियर लीग पर्व(2) 2021क्रिकेट स्पर्धेचा अंतिम मानकरी महापुरुष बेळणे संघाने विजेतेपद पटकावले तर बेळणे येथीलच पावणादेवी या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे .

नांदगाव येथील कोळंबा क्रिकेट क्लब आयोजित भव्य प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धा उत्साहात बहुसंख्य क्रीडा प्रेमिकांच्या उपस्थित संपन्न झाले आहे. आज अंतिम सामन्यात दोन्ही बेळणे येथीलच संघ होते . आणि यात महापुरुष बेळणे संघाने विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक -21 हजार 21, (डॉ संजय बिडये पुरस्कृत, व आकर्षक चषक) द्वितीय पारितोषिक 15 हजार 21 (पंढरी वायंगणकर पुरस्कृत व आकर्षक चषक) इतर आकर्षक बक्षीसे खेळाडूंसाठी देण्यात आली आहेत. संघांना व वैयक्तिक आकर्षक सर्व चषक धोंडू शंकर मोरजकर यांच्या स्मरणार्थ भाई मोरजकर पुरस्कृत देण्यात आले आहेत.

यात वैयक्तिक आकर्षक पारितोषिक देण्यात आली यात सामनावीर व मालीकाविर सुर्या चव्हाण, उत्कृष्ट फलंदाज अँड. प्रशांत तांबे, उत्कृष्ट गोलंदाज विनय तांबे आदींना पारितोषिक देण्यात आली आहे. पारितोषिक वितरणप्रसंगी व भारतीय जनता पक्षाचे तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, उपसरपंच व मंडळाचे उपाध्यक्ष नीरज मोर्ये, मंडळ अध्यक्ष नारायण उर्फ़ भाई मोर्ये, राजू तांबे , मंगेश मोरये , मारुती मोरये, तुकाराम तुप्पट , अण्णा बिडये ,अमित मोरजकर केदार खोत, विव्ठल बिडये ,सिध्देश भाट ,गुरु मोरये ,विजय मोरये ,व खेळाडु व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेत समालोचक म्हणून राजा सामंत व बादल चौधरी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली व रसिक प्रेक्षकांना आकर्षित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!