*कोकण Express*
*अटकपूर्व जामिनासाठी आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयात;उद्या २८ डिसेंबरला सुनावणी*
शिवसैनिक संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात ऍड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी २७ डिसेंबर रोजी होणार होती. याबाबत उद्या २८ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती ऍड. रावराणे यांनी दिली आहे.
भांदवी कलम ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात आम. नितेश राणे यांना अटकपूर्व जमीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार? हे चित्र उद्या २८ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.