*कोकण Express*
*जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्रीराम विभूते यांना भारत प्रतिमा गौरव राष्ट्रीय पुरस्काराने कोल्हापूर येथे गौरविण्यात आले*
*कासार्डे ः संजय भोसले*
इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर कोल्हापूर यांच्या वतीने व समाजगौरव शैक्षणिक,सामाजिक बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर,समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग,ऍक्टिव्ह बहुउद्देशी सेवाभावी संस्था कोल्हापूर,जगन्नाथन शेठ कला संस्था गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा *भारत प्रतिमा गौरव पुरस्कार 2021 (INDIA STAR IMAGE AWARD)* हा पुरस्कार जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ शाळेचे उपक्रमशील ,तंत्रस्नेही व अष्टपैलू शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते यांना कोल्हापूर प्रधान करण्यात आला.
समाजातील लोकांना व पालकांना एकत्रित करून अगदी लहान शाळेत त्यांनी भरगोस शैक्षणिक उठाव करून एक उत्कृष्ट शाळा निर्माण केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे तांबळवाडी शाळेत असताना विभूते यांनी अनेक उपक्रम राबवत शाळेची गुणवत्ता,कला,क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरीची दाखल घेवून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.हा पुरस्कार २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे झालेल्या इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरच्या तिसऱ्या वर्धापनदिन व कला,साहित्य, सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन कोल्हापूर २०२१ निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर (आण्णा नाईक) यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला आहे.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी सभापती दिलीप तळेकर, माजी अध्यक्ष शशांक तळेकर, विद्यमान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव,केंद्रप्रमुख संजय पवार,केंद्रप्रमुख सदगुरू कुबल,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम पद्मजा करंदीकर व सर्व शिक्षकवृंद , तळेरे ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.