‘त्या’ हल्याप्रकरणी सहावा संशयित पोलिसांच्या ताब्यात…!

‘त्या’ हल्याप्रकरणी सहावा संशयित पोलिसांच्या ताब्यात…!

*कोकण  Express*

*‘त्या’ हल्याप्रकरणी सहावा संशयित पोलिसांच्या ताब्यात…!*

*कणकवली न्यायालयात केले हजर; संशयित आरोपीला 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी!*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

संतोष परब यांच्या झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहाव्या संशयितास कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याला रात्री कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती समोर येत असून न्यायालयात नेमके काय घडले याची माहिती समजु शकली नाही. संशयित आरोपीस जिल्ह्याबाहेरूनच ताब्यात घेण्यात असून तो मुख्य आरोपी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडून गुप्तता व सावधानगिरी बाळगली जात आहे. त्यामुळे परब यांच्यावर हल्ल्या करण्या मागचा नेमका उद्देश काय? खरा सूत्रधार कोण आहे? याबाबत आता जनतेची उत्सुकताही वाढत चालली आहे. या हल्ल्याप्रकरणावरून भाजप व सेनेने पुन्हा एकदा राजकीय सामना रंगला आहे. या हल्लाप्रकरणाचे गूढ उलगडत नसल्याने जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील बनू लागले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला सहावा संशयित हा घटनेतील महत्वाचा मानला जात आहे. तो पुणे येथील असून राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे मेसेजही सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र, याविषयी पोलिसांनी अद्यापही दुजोरा दिलेला नाही. या संशयिताला दिल्लीमधून ताब्यात घेतल्याचे समजते. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर हा संशयित फरार होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. अखेरीस तो ताब्यात मिळाला आहे. या प्रकरणी सहा जणांचा ताब्यात घेतले त्यांची नावे जाहीर करण्याबाबत पोलिसांचे मौनव्रत कायम आहे. साहजिकच घटनेमधील गुढ आता दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे ही केस कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!