*कोकण Express*
*सुडाचे राजकारण करून दडपशाही केल्यास गप्प बसणार नाही:राणेंचा इशारा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला पोषक वातावरण असून जिल्हा बँकेत भाजपलाच विजयी कौल मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हतबल झाले असून सुडाचे राजकारण करून भाजपा कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना त्रास देत अटकसत्र सुरू करत आहे. दडपशाहीने भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींना अटक केल्यास गप्प बसणार नाही केंद्रात आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा असा इशारा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिला. यावेळी आम. रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प.गटनेते रणजीत देसाई उपस्थित होते. कणकवलीतील संतोष परब हल्ल्यातील आरोपी पकडले गेलेत. तरीही या प्रकरणात आ.नितेश राणे आणि माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांना वारंवार पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस चौकशी करून त्रास देत असून त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.

