*कोकण Express*
*संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने 27 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर*
*संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने 27 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संघटन सरचिटणीस तथा कलमठ ग्रा. पं. सदस्य संदीप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त 27 डिसेंबर रोजी संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कलमठ ग्रा.पं. च्या सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


