जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्रिसूत्रीचा वापर करावा

जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्रिसूत्रीचा वापर करावा

*कोकण Express*

*जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्रिसूत्रीचा वापर करावा…*

*बांदा ः लवू परब*

आपल्या जीवनात यशस्वी बनायचे असेल तर वाचन, चिंतन व मनन या त्रिसूत्रीचा वापर विद्यार्थ्यांनी करावा. सरकारी अधिकारी बनण्यासाठी प्रचंड मेहनत व जिद्द आवश्यक असते. यासाठी शालेय पातळीवरच अभ्यासाची गोडी लावून घ्या असे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी येथे केले.
येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व गणेश राऊळ मित्रमंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री रेडकर बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तलाठी वर्षा नाडकर्णी व बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या महीला जिल्हा अध्यक्षा दर्शना केसरकर, उपाध्यक्ष मिलींद धुरी, आनंद कांडरकर, श्री साईबाबा भक्तसेवा मंडळचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, विश्वस्त साईराज साळगावकर, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर, पि.एस.सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी तिमिरातुन तेजाकडे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशनच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देउन पोलीस निरीक्षक काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निरीक्षक काळे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थानी जिद्द ठेवुन, स्पर्धा परीक्षेची तयारी करून व मेहनत घेऊन यश संपादन केले पाहीजे. आपण इंजीनीयर, डॉक्टर, आय पी एस, कलेक्टर बनुन आपल्या गावाचे नाव उज्वल करा. यावेळी वर्षा नाडकर्णी, मुख्याध्यापक श्री पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नाना श्री रेडकर यांनी उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पि. एस. सावंत यानी केले. तर आभार राकेश केसरकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!