*कोकण Express*
*मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयासाठी सर्वतोपरी मदत करणार*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाहीराष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वेधले लक्ष*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी येथे नियोजित मल्टिस्पेशालिटी रुग्णालय निधी व जागेअभावी रेंगाळले आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेला निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
जागा संपादित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसह रुग्णालयासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, अर्चना घारे-परब आदी उपस्थित होते.