वराडकर कुटुंबीयांना बांदा भाजप कडून आर्थिक मदत

वराडकर कुटुंबीयांना बांदा भाजप कडून आर्थिक मदत

 *कोकण  Express*

*वराडकर कुटुंबीयांना बांदा भाजप कडून आर्थिक मदत…*

*बांदा ः प्रतिनिधी*

शहरातील गवळीटेम्ब येथील भाजपचे कट्टर कार्यकर्ते (कै.) सुधीर वराडकर यांच्या कुटुंबियांना बांदा भाजपच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी सुधीर यांचे आकस्मिक निधन झाले होते. बांदा भाजपने वराडकर कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आर्थिक स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी बांदा शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला. दोन दिवसात मदत गोळा करण्यात आली.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वराडकर कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन मदत देण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल काळसेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, बाळा आकेरकर, दीपक सावंत, उद्योजक भाऊ वळंजू, महिला तालुकाध्यक्ष अपेक्षा नाईक, सुनील धामापूरकर, संदीप बांदेकर, ऋषिकेश देसाई आदी उपस्थित होते.

वराडकर कुटुंबियांना यापुढेही मदतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!