*कोकण Express*
*उपमुख्यमंत्री ना,श्री अजितदादा पवार यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या ‘राजगड’ निवासस्थानी दिली भेट*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना, अजितदादा पवार यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असताना जिल्हाध्यक्ष मा, अमित सामंत यांच्या कुडाळ येथील राजगड या निवासस्थानी आवर्जून भेट दिली,या भेटी दरम्यान पक्ष संघटनात्मक विषयावर व अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर खास चर्चा केली,ना,अजितदादा पवार व ना,सतेज पाटील यांना भेट वस्तू दिल्या, यावेळी कार्यकर्त्यांनी दादांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दादांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चहा पाण्याचा आश्वाद घेऊन पुढील नियोजित दौ-यावर जाण्यासाठी चिपी विमानतळाकडे प्रयाण केले.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,पालकमंत्री ना.उदयजी सामंत, गृहराज्यमंत्री ना,सतेजजी पाटील,माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, आमदार वैभव नाईक, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, संदेश पारकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चनाताई घारे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीरभाई शेख, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत,हितेश कुडाळकर सर्वेश पावसकर,ओबीसी तालुका अध्यक्ष बाळा मेस्त्री,बाळा गावडे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.