*कोकण Express*
*सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा: ॲड.मुक्ता दाभोलकर*
*कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली व नगरपंचायत संयुक्त विद्यमाने कार्यक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व अन्यायाबाबत तीलाच दोषी धरणे चुकीचे असून अत्याचार करणारा खरा दोषी आहे, अत्याचार व अन्याय करणाऱ्याला कडक शासन झाले पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अंधद्धेच्या निर्मुलनासाठी समाजात जनजागृती केली पाहिजे. तसेच जगात अमुलाग्रह बदल होत असून स्त्रीयांना या बदलाचा स्वीकार करून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विज्ञानविषयक कार्यक्रमांचे प्रमाण अल्प असल्याबाबत सामाजिक कार्यकत्या व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या अँड. मुक्ता दाभोलकर यांनी बोलताना खंत व्यक्त केली. भारतीय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व स्त्री मुक्ती दिनानिमित्त दीनदयाळ अंतोदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत हिरकणी लोकसंचलित साधन, कणकवली, कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नगरवाचनालयाच्या सभागृहात स्त्रिया आणि टीव्ही मालिकांचे वर्चस्व विशेष गप्पा आयोजित कार्यक्रमात श्रीमती दाभोलकर बोलत होत्या. यावेळी व्यसपाठीवर नशामुक्ती केंद्राच्या अर्पिता मुंबरकर, डॉ रश्मी पेंडुरकर, नगरसेविका उर्वी जाधव, सृष्टी तावडे, सुषमा हरकुळकर, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष सुचिता पालव, उपाध्यक्ष राजश्री पिळणकर, सचिव प्रणाली कांबळे, सहसचिव स्वाती राणे, खजिनदार प्रिया सुरूडकर, शुभांगी उबाळे, दिव्या साळगावकर, स्नेहा कदम, इशा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना श्रीमती दाभोलकर म्हणाल्या, कुटुंबात व समाजात स्त्रियांचा रोल मोठा आहे. समाजात असलेल्या पुरुषप्रधान सत्तेमुळे त्यांच्या रोलकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तसेच टीव्ही मालिकांमधून स्त्रियाची साचेबंद प्रतिमा तयार केली जात आहे. या प्रतिमेमुळे समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अद्यापहि बदलत नाहि आहे. तसेच मालिकांमधून मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धेचा प्रचार व प्रसार केला जातो. तसेच अंधश्रद्धाविषयावरील जाहिरावर दाखविण्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जातो. अशा जाहिरातिमधून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे, हि बाब अत्यंत दुर्दैवी असून करणी, भानमती या गोष्टी धादांत खोटारड्या आहेत, असे त्यांनी सांगितले. कौटुंबीक, सामाजिक जबाबदाऱ्या पार पडाताना स्त्री आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्या अनेक आजारापणाना बळी पडत आहे.
त्यामुळे माहीलांना आपल्या आरोग्य दुर्लक्ष न करताना विनाकारण उपवास करू नये, असा सल्लाहि त्यांनी दिला. स्त्रीयांना मासिक पाळी येणे हि नैसर्गिक प्रक्रिया असून तिला अपिवत्र गोष्ट मानू नये. स्त्रीयाना ज्या गोष्टी आवडत नाहि, त्या गोष्टीविरुद्ध निर्भरपणे बोलले पाहिजे. स्त्रियांनी आपले प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे श्रीमती दाभोलकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात काहि माहिलांना आपल्या मनातील शंकाकुशंका श्रीमती दाभोलकर यांनी विचारून त्यांच्याकडून त्यांचे निरसरन करून घेतले.
आधुनिक युगात महिला आत्मनिर्भर होत असतानाहि त्यांच्या खांद्यावर रुढी व परपंरचे जोखड कायम आहेत. समाजात अजूनहि स्त्रीकडे माणूस नव्हे वस्तू म्हणून पाहिले जाते. त्यामुळे माहिलांवर अत्याचार व अन्याय होण्याचे प्रमाण जास्त आहे. हि परीस्थिती बदलण्यासाठी स्त्रियानी एकत्र आले पाहिजे. समाजात व कुटुंबात असलेली पुरुषप्रधान सत्तेची मूल्ये स्त्रियानी स्वीकारली नाहि पाहिजे. हा जेव्हा बदल घडून येईल तेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन होईल. तसेच अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी स्त्रियानी पुढाकार घ्यावा असे ही त्या म्हणाल्या.