*कोकण Express*
*उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्गात*
*राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक*
*राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते राष्ट्रवादी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत ही त्यांची आढावा बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले आहे.