जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्गात

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्गात

*कोकण  Express*

*जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्गात..*

*विरोधकांना आरोप-प्रत्यारोपांना प्रत्युत्तर देणार ; सतिश सावंत*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या आरोप-प्रत्यारोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या येत आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे उमेदवार तथा अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेच्या चाव्या चुकीच्या लोकांच्या हातात जायला देऊ नका, यासाठी बँकेच्या सभासदांनी सावध पवित्रा घ्यावा. कोणी कितीही आमिष दाखवले तरी त्याला बळी पडू नये, असेही आवाहन त्यांनी केले. आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आमदार दीपक केसरकर प्रमोद धुरी, अशोक दळवी, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सावंत म्हणाले, या ठिकाणी जिल्हा बँकेच्या प्रकारासाठी उद्या रविवारी अजित पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या सभेत संपर्कप्रमुख बंटी उर्फ सतेज पाटील त्याचबरोबर आमदार दीपक केसरकर, शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत त्याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता येथील शरद भवन मध्ये श्री पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा. हे तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सर्व सहकारातील जाणकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!