*कोकण Express*
सावंतवाडीत भाजप कडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
देशाचे माजी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, नेमळे सरपंच विनोद राऊळ, हेमंत बांदेकर, विनोद सावंत, अजय सावंत, संदीप बिडये, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, परीक्षेत मांजरेकर आदी उपस्थित होते.