*कोकण Express*
*नाट्य कलावंत राजेश कांडर यांचा अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे गौरव*
*सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मूळ बावशी(कणकवली) येथील आणि सध्या पुणे पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेल्या नाट्यकलावंत राजेश कांडर यांचा अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे विख्यात चित्रपट अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
राजेश कांडर सुमारे वीस वर्ष नाट्य कलावंत म्हणून यशस्वीपणे काम करत असून एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर जयंत पवार, प्रभाकर भोगले अशा मातब्बर नाट्य लेखकांच्या एकांकीकेंचेही दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर पुणे पिंपरी-चिंचवड सारख्या मोठ्या शहरात सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळाच्या ‘नाट्यसिंधू’ या संस्थेची त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर रंगकर्मी कांडर यांचा सदर गौरव करण्यात आला
अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.