*कोकण Express*
*उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईस यश*
*इन्सुलीत गोवा बनावटीची ४५ लाखांची दारु जप्त*
*६४ लाख ७१ हजार ३६० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त*
*बांदा ः प्रतिनिधी*
इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर आज अवैध दारू वाहतुकीच्या कारवाईत ४४ लाख ६१ हजार ३६० रुपये किमतीच्या दारुसह एकूण ६४ लाख ७१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक पंजाबराव बाबुराव लोखंडे (४९, रा. नागपूर) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
नाताळ व इयर एंडिंगच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार इन्सुली तपासणी नाक्यावर पथकाने सापळा रचला होता. सायंकाळी उशिरा गोव्यातून सिंधुदुर्ग हद्दीत येणारा टेम्पो (एमपी ०८ जीए ३६३५) तपासणीसाठी थांबविण्यात आला. टेम्पोत ८७७ दारुचे बॉक्स भरण्यात आले होते.
पथकाने केलेल्या कारवाईत ४४ लाख ६१ हजार ३६० रुपये किमतीची दारू, २० लाख रुपयांचा टेम्पो व मोबाईल असा एकूण ६४ लाख ७१ हजार ३६० रुपये किमतीचा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करीत आहेत.