महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेल चा जाहीरनामा जाहीर

महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेल चा जाहीरनामा जाहीर

*कोकण Express*

*महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेल चा जाहीरनामा जाहीर*

*आम्ही शेती माती आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारी माणसे ; सतीश सावंत*

*सिंधुदुर्गनगरी*

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील आमच्या, साडे सहा वर्षाच्या कालावधीत बँकेने अनेक पुरस्कार मिळविले.आणि प्रगतीही केली आहे. आम्ही शेती, माती, आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारी माणसे आहोत त्यामुळे पारदर्शक कारभार, शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षांचा संवेदनशीलपणे विचार करून बँकेचा कारभार केला आहे. यापुढेही अधिक चांगले काम कसे करायचे याचे व्हिजन आमच्याकडे आहे. त्यामुळे बँकेचे भवितव्य कशात आहे हे ओळखून मतदारानी मतदान करावे. विरोधकांच्या धनशक्ती ला बळी पडू नये. असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष तथा उमेदवार सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना सतीश सावंत म्हणाले आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस महा विकास आघाडी पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणूक लढवीत आहोत. आमच्याकडे पुढील पाच वर्षाचे व्हीजन आहे .अनुभवी आणि सहकारातील ज्ञान असलेले उमेदवार आमच्याकडे आहेत. गेल्या साडे सहा वर्षाच्या आपल्या कारकीर्दीत अनेक चांगले निर्णय व पारदर्शक कामकाज केल्याने जिल्हा बँकेने अनेक पुरस्कार आणि प्रगती केली आहे. आम्ही शेती ,माती आणि शेतकऱ्यांवर प्रेम करणारी माणसे आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षांचा संवेदनशीलपणे विचार करून बँकेचा कारभार केला आहे. ग्राहकांच्या हिताच्या योजना तसेच विविध सुविधा निर्माण करुन बँकेवरचा विश्वास कायम राखला आहे. आता विरोधक बँकेची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना बँक जिंकण्यासाठी हवी आहे. आणि त्यासाठी कोणत्याही पातळीवर जायची त्यांची तयारी आहे. यातूनच असंस्कृत घटना घडत आहेत. विरोधकांकडे कोणतेही व्हिजन नाही, केवळ त्यांना सत्ता काबीज करायची आहे. आम्ही पुढील पाच वर्षाचे व्हीजन ठेवून जाहीरनामा तयार केला आहे .त्यामध्ये शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेला पतपुरवठा करणे, पुढील पाच वर्षात एक लाख लिटर दूध उत्पादन व त्यासाठी विविध कर्ज योजना राबवणे ,शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे ,पतसंस्थांचे संगणीकरण व सोसायटी आणि पतसंस्थेच्या शाखांमध्ये मागणीनुसार जिल्हा बँकेची ह्यूमन एटीएम सुविधा सुरू करणे, यासह शेतकरी ग्राहक यांच्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून प्रत्येक ग्राहकाला जिल्हा बँकेबाबत आपुलकी आणि अभिमान वाटेल असे काम यापुढे करण्याचा आमचा जाहीरनामा आहे. त्यामुळे मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना व धनशक्ती ला बळी पडू नये. असे आवाहन यावेळी सतीश सावंत यांनी केले.

स्वतःच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्याची आमची संस्कृती नाही

कणकवली येथे घडलेल्या हल्ला प्रकरणाबाबत बोलताना सतीश सावंत म्हणाले, हे प्रकरण पोलिस हाताळत आहेत त्यामुळे याबाबत बोलणे योग्य होणार नाही. मात्र स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती आणि संस्कृती आमची नाही ती प्रवृत्ती कोणाची आहे हे जगजाहीर आहे. २००९ मध्ये मधुसूदन बांदिवडेकर यांच्यावर हल्ला झाला होता, तो कोणत्या मतभेदातून व कोणी घडवून आणला हे जगजाहीर आहे तेव्हा याबाबत आम्हाला सांगायची गरज नाही असे यावेळी सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!