कणकवली येथे उद्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम

कणकवली येथे उद्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम

*कोकण Express*

*कणकवली येथे उद्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम…!*

*भ्रष्टाचार निर्मुलन सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान…!*

*नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसीलदार आर जे पवार यांचे आवाहन…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली येथील नगरपंचायत वाचनालय हॉल येथे 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांसाठी केंद्र शासनाकडून – Turning Point for Indian Consumers : The consumers Protection Act 2019 ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सीताराम उर्फ दादा कुडतरकर, असी. रोटरी क्लब कणकवली, सदस्य, भ्रष्टाचार निर्मुलन सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!