हल्ल्या नंतर पुन्हा कणकवलीत अज्ञात गाडीवर दगड फेक…!

हल्ल्या नंतर पुन्हा कणकवलीत अज्ञात गाडीवर दगड फेक…!

*कोकण Express*

*हल्ल्या नंतर पुन्हा कणकवलीत अज्ञात गाडीवर दगड फेक…!*

*किनार राजकीय की अन्य कशाची…?*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली हे जिल्ह्यातील राजकारणाचे महत्वाचे केंद्र बिंदू शहर आहे.गेल्या काही वर्षानंतर कणकवलीची ओळख शांत शहर म्हणून निर्माण झाली होती.मात्र बदलत्या राजकीय हालचालीन मुळे या शहराची ओळ्ख पुन्हा तणावग्रस्तकडे होत असल्याचे दिसत आहे.याचे कारण म्हणजे सहा दिवसांपूर्वीच भर दिवसा कणकवली शहरात शिवसैनिकांवर झालेला हल्ला व आज गुरुवारी सायंकाळी कणकवलीतच एका बाहेरील गाडीवर अज्ञाताकडून झालेली दगड फेक होय.या साऱ्याच घटनांमुळे कणकवली पुन्हा एकदा भीतीच्या छायेखाली गेली आहे.या गाडीवरील झालेली दगड फेक ही राजकीय की अन्य कोणत्या वैयक्तिक कारणातून झाली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक ही राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सहा दिवसापूर्वीच जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवली शहरातील नरडवे रोडवर काही अज्ञातांकडून झालेला प्राणघातक हल्ला यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.आज सायंकाळी अज्ञाताकडून गाडीवरील दगड फेकीच्या घटने नंतर पुन्हा काही काळ तणावाचे वातवरण निर्माण झाले होते.

शहरात भर दिवसा घडणाऱ्या घटनेमुळे शांत कणकवलीची ओळख पुन्हा अशांत शहराकडे होत असल्याची चर्चा शहरात रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!