हल्लाप्रकरणी संशयितांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

हल्लाप्रकरणी संशयितांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

*कोकण Express*

*हल्लाप्रकरणी संशयितांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ….!*

*कमालीची गुप्तता पाळत तपास सुरू….!*

*आणखी संशयितांच्या शोधात पोलिस…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच सवंशयितांची पोलीस कोठडी संपली असल्याने पुन्हा आज दुपारी 3.30 वा कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाच आरोपीच्या वतीने चंद्रकांत सावंत यांनी काम पाहिले. सरकारी वकील अनिल कुंटे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. करंजे गावचे माजी सरपंच तथा जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम करणाऱ्या संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी 11 वा सुमारास नरडवे रोड येथे प्राणघातक हल्ला झाला होता या दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करत इनोव्हा कारसह चौघांना ताब्यात घेतले होते या चार सवंशयितांना न्यायालयाने 23 डिसें पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या दरम्यान आणखी एका संशयिताला पोलिसांनी काल ताब्यात घेतले या पाच ही जणांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांच्या वतीने आणखी दोन सवंशयितांना ताब्यात घेण्यासाठी वाढीव पोलीस कोठडी मागण्यात आली यावेळी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपीच्या वतीने अँड चंद्रकात सावंत यांनी काम पाहिले. सवंशयित आरोपींना न्यायालयात हजर करताना पोलिसांनी पूर्ण गुप्तता पाळली होती.विशेष म्हणजे बुरखे घालूनच सवंशयित आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच न्यायालयाच्या बाहेर देखील दंगल नियंत्रण पथक व विशेष पोलीस पथक तैनात ठेवण्यात आले होते. याप्रकारना बाबत कमालीची गुप्तता राखत पोलीस तपास सुरू असल्याने पोलिसांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!