*कोकण Express*
*जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत समृद्ध पॅनेल विजयी होईल :अबिद नाईक*
जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी सहकार समृद्धी पॅनेल व सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. जिल्हा बँकेच्या उत्कर्षा व भरभराटीमध्ये सतीश सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सतीश सावंत यांनी केलेली कामांमुळे महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांना मतदार निवडून देतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी व्यक्त केला.
सतीश सावंत हे सर्वांनी विश्वासात घेऊन काम करणारे नेतृत्व असून त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सभासद व शेतकर्यांच्या हितासाठी उत्तम प्रकारे काम केले आहे.असे राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक म्हणाले.