*कोकण Express*
*जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचा सहकारातील दहशतवाद मोडून काढा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात काही मंडळी राजकीय दहशतवाद आणू पाहत आहेत. या दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार मी केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी हा राजकीय दहशतवाद मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून 19 उमेदवार निवडून लढवत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी सतीश सावंत कणकवलीत बोलत होते. जिल्हा बँक ही सिंधुदुर्गाची शिखर बँक आहे. ही सर्वसामान्यांची बँक असून लटारूंच्या हाती जावू न देणे मतदारांची जाबाबदारी आहे. मतदारांनी विरोध गटाच्या आमिष व धनलक्ष्मीला बळी पडू, असे आवाहन सतीश सावंत यांनी मतदारांना केले.
साडेसात वर्षांत मी व संचालक मंडळाने ही बँक अबाधित ठेवण्याचे काम केलेले असून आम्हाला पुन्हा संधी दिल्यास बँकेच्या माध्यमातून आम्ही चांगले काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. माझे निवडणूकीतील प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर राजकीय दहशतवादातून हल्ला झालेला आहे. या हल्लेखोरांना आम्ही सोडणार नसून त्याचा शोध घेण्यास पोलीस अधीक्षकांना सांगितले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी पॅनेलच्या नेतेमंडळींकडून विविध आमिषे दाखवली जात असून मतदारांनी त्यांच्या आमिषाला बळी पडू नये, आवाहन श्री. सावंत यांनी केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुशांत नाईक यांच्यासारखे सुसंस्कृत उमेदवार महाविकास आघाडीने निवडणूक रिंगणात उतरविले आहेत .कै. श्रीधरराव नाईक यांचा सहकाराकडे ओढा होता. सुशांत नाईक यांना विजयी करून श्रीधर नाईक यांचे हे सहकारातील स्वप्न मतदार निश्चितपणे पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त करताना सतीश सावंत म्हणाले, कोणत्याही दहशतीला येथील मतदार घाबरणारा नाही. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणार असून मतदारांना धमकावण्याचे प्रकार विरोधक करत आहेत .त्याला बळी पडू नका .कारण निवडणूक प्रक्रिया ही गुप्त आहे त्यामुळे निवडणूक यंत्रणेने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे असेही सतीश सावंत यांनी सांगितले.