सिंधुुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सिंधुुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

*कोकण Express*

*सिंधुुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ*

*प्रचारपत्राचे प्रकाशन मान्यवरांच्य हस्ते ; महाविकास आघाडीच्या नेेतेमंडळींची उपस्थिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पतसंस्था मतदार संघातून निवडणूक रिगणात उतरलेले सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.त्यांची लढत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याबरोबर होणार आहे. संकष्टी चतुर्थीचा मुहूर्तसाधत एसटीच्या विभागीय कार्यालयातील गणपती मंदिरात गणेशाचे दर्शन घेत तसेच कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास प्रारंभ केला आहे. तसेच सुशांत नाईक यांच्या प्रचारपत्राचे प्रकाशन मान्यवरांच्य हस्ते करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेविका मानसी मुंज, मयुरी नाईक, ज्येष्ठ नागरिक आबा दुखंडे, नगरसेवक कन्हैया पारकर, विनोद मर्गज, सुभाष सावंत, शिवसेनेेचे उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, राजू राठोड, शेखर राणे,दिलीप वर्णे, प्रतीक्षा साटम, स्नेहल म्हसकर, संकेत नाईक, भास्कर राणे, संजय पारकर, विनायक मेस्त्री, तेजस राणे, रुपेश आमडोस्कर,अमित केतकर,बाळू पारकर,प्रशांत वनस्कर, प्रसाद अंधारी, योगेश मुंज ,सुनिल पारकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!