*कोकण Express*
*ग्राम पंचायतींच्या पोट निवडणुकीत ७०.५६ टक्के मतदान*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील चार ग्रामपंचायत मध्ये आज रिक्त असलेल्या जागांसाठी पोट निवडणूक पार पडली असून, 70.56 टक्के एकूण मतदान पार पडले असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. यामध्ये बांदा 66.57%, सांगेली 70.22%, देवसू 70.07%, निरवडे 74.46% मतदान पार पडले असून, उद्या सकाळी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून, दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्यातील एकूण पंधरा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता यामध्ये सात ग्रामपंचायती मधील अनुसूचित जाती जमाती च्या जागा रिक्त राहिल्या असून उर्वरित सात ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तीन ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली तर बांदा देवसू सांगली व निरवडे या चार ग्रामपंचायतीच्या निवडणूका आज पार पडलेल्या यामध्ये एकूण 70.56 टक्के इतके मतदान झाले त्यामध्ये 758 स्त्री तर 867 पुरुष पकडून 1625 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. यात बांदा ग्रामपंचायतीसाठी 66.57 टक्के, निरवडे 74.46 टक्के, देवसू 70.07 टक्के,सांगेली 70.22 टक्के, इतके मतदान झाले. चारही ग्रामपंचायतीत चुरशीचे मतदान झाले. यापैकी बांदा मध्ये महाविकास आघाडी व भाजपाने चुरस निर्माण केली आहे. दरम्यान बुधवारी सकाळी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल होणार असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.