*कोकण Express*
*संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम*
*कासार्डे ः संजय भोसले*
संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार – देवगड व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.
या स्वच्छता मोहिमेत शालेय विद्यार्थी हिरिरीने सहभागी झाले होते.यामध्ये प्रामुख्याने विद्युत उपकेंद्र तळेबाजार, वरेरी रोड, तळेबाजार बाजार पेठ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँक या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, संस्थाप्रमुख, ग्रामस्थ, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त ही स्वच्छता मोहीम राबवली होती.
यावेळी प्रमुख उपस्थिती महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार हायस्कूलच्या संस्थचे अध्यक्ष संदीप तेली, खजिनदार संतोष वरेरीकर, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा उपाध्यक्ष नंदन अंकुश घोगळे,शिक्षक अजित कदम, सुशील जोईल, महादेव चव्हाण, देवांगी परब व इतर सर्व शिक्षक,शिक्षिका, स्वच्छता अभियान मध्ये सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांना हाँड ग्लोज देण्यात आले होते.सर्व विद्यार्थ्यांना व स्वच्छता मोहीम मध्ये सहभागी झालेल्याना संस्था अध्यक्ष संदीप तेली यांनी अल्पोपहाराची सोय केली.