आपला पराभव होणार याची खात्री पटल्यानेच मतदारसंघ जाहीर करायला घाबरतात

आपला पराभव होणार याची खात्री पटल्यानेच मतदारसंघ जाहीर करायला घाबरतात

*कोकण  Express*

*आपला पराभव होणार याची खात्री पटल्यानेच मतदारसंघ जाहीर करायला घाबरतात*

*माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांचाा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना थेट सवाल*

*सिंधुदुर्ग*

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेलप्रमुख असलेले विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत अद्यापही आपला मतदारसंघ जाहीर का करत नाहीत ? असा खडा सवाल करत माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत यांनी सतीश सावंत यांना चांगलेच पेचात पकडले आहे. आपला पराभव होणार याची खात्री पटल्यानेच सतीश सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, अशा शब्दांत गोट्या सावंत यांनी सतीश सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

30 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक रणनीती पार पाडणारे संदेश उर्फ गोट्या सावंत आणि शिवसेना नेते तथा महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत यांच्यातील विजयासाठीची रस्सीखेच येत्या दिवसांत चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. गतवेळी राणेंसोबत असणारे सतीश सावंत हे कणकवली तालुका शेती संस्था म्हणजेच विविध कार्यकारी सेवा सोसायटी या कणकवली तालुका मतदारसंघातून बिनविरोध जिल्हा बँकेवर निवडून गेले होते. त्यावेळी राणेंची खंबीर साथ सतीश सावंत यांना होती. आता मात्र शिवसेनेत दाखल झालेले सतीश सावंत भाजपा पॅनेल विरोधात जिल्हा बँक निवडणूक मैदानात आहेत. मात्र गतवेळी बिनविरोध निवड झालेल्या सतीश सावंत यांनी यावेळी सावध पाऊल टाकत कणकवली शेती संस्था या कणकवली तालुका मतदारसंघातून आणि पतसंस्था या जिल्हा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. सतीश सावंत यांनी आपला नेमका मतदारसंघ अद्याप जाहीर केलेला नाही. आणि याच मुद्द्यावर गोट्या सावंत यांनी सतीश सावंत यांना लक्ष्य केले आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीचे पॅनेल निवडणुकीत उतरवले आहे. महाविकास आघाडी पॅनेल प्रमुख स्वतः सतीश सावंत आहेत. तर विरोधात भाजपाचे पॅनेल उभे ठाकले आहे. भाजपाच्या उमेदवारांनी आपापले मतदारसंघ जाहीर केले आहेत. मात्र विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष असणारे सतीश सावंत अजूनही आपला मतदारसंघ का जाहीर करू शकत नाहीत ? असा थेट सवाल करून जिल्हा बँक निवडणुकी आधीच सतीश सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 8 वर्षाहून अधिक काळ जिल्हा बँक अध्यक्षपदी राहूनही आपला पराभव होणार याची खात्री झाल्यामुळेच सतीश सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे सांगत गोट्या सावंत यांनी हल्लाबोल केला. आम्हाला सहकारातले काही कळत नाही पण स्वतःला सहकार महर्षी म्हणवणारे सतीश सावंत स्वतःचा मतदारसंघ जाहीर करायला का घाबरतात ? असा थेट सवाल गोट्या सावंत यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!