शिवसेना लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांनी जखमी संतोष परब यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घेतली भेट

शिवसेना लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांनी जखमी संतोष परब यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घेतली भेट

*कोकण  Express*

*शिवसेना लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांनी जखमी संतोष परब यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घेतली भेट*

*…तर हल्लेखोरांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ ; आप्पा पराडकर*

*कणकवली  ः प्रतिनिधी*जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर भारतीय जनरल कामगार सेना अध्यक्ष व शिवसेना लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांनी जखमी संतोष परब यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली.अशा हल्ल्यातून शिवसैनिकांनी घाबरून जाऊ नये असे सांगत आप्पा पराडकर यांनी संतोष परब यांना धीर दिला. तसेच हल्लेखोरांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांनी दिली. तसेच आप्पा पराडकर यांनी कुडाळ शिवसेना शाखेत भेट देत शिवसैनिकांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना समन्वयक राजू राठोड, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!