*कोकण Express*
*कुडाळात शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना – राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता आज सायंकाळी कुडाळ शहरातून ढोल ताशाच्या गजरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ हिंदू कॉलनी मधून या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. तेथुन बाजारपेठेत काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कुडाळवासीय मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, विकास कुडाळकर, राष्ट्रवादी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संघटक बबन बोभाटे, शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, संजय भोगटे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे मंदार शिरसाट सचिन काळप आदींसह सर्व उमेदवार ,शिवसेना राष्ट्रवादी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.