*कोकण Express*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट*
*ओरोस येथील शरद भवन येथे सिंचन प्रकल्पांबाबत केली चर्चा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संदेश पारकर यांनी ओरोस येथील शरद भवन येथे ना. जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत सिंधुदुर्गातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाबाबत लक्षवेधक हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा,अशी मागणी केली. तसेच सिंधुदुर्गात आल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन जयंत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी ना.जयंत पाटील यांनी मुंबईत गेल्यानंतर ताबडतोब सिंचन प्रकल्पाबाबत बैठक लावून रखडलेल्या कामांना चालना देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत,अवधूत मालणकर,उपाध्यक्ष अनंत पिळणकर,प्रफुल्ल सुद्रीक,रुपेश जाधव आदी उपस्थित होते.