*कोकण Express*
*करुळ येथील क्रिकेट स्पर्धेत कुर्ली संघ विजेता*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
करूळ येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कुर्ली संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर रामेश्वर एडगांव संघाने उपविजेतेपद पटकाविले. दत्त जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या स्पर्धा पार पडल्या. विजेत्या कुर्ली संघाला रोख रुपये ११ हजार व चषक, उपविजेत्या संघाला ७ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अक्षय पाटील कुर्ली, उत्कृष्ट गोलंदाज राजेश माने कुर्ली, सामनावीर अक्षय पाटील कुर्ली, मालिकावीर नीलेश गुरव एडगाव यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सभासदांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे उद्घाटन वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांच्या हस्ते पार पडले. तर बक्षीस वितरण माजी पं. स. सदस्य बाळा कदम, किशोर कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र पवार, यशवंत कोलते, दत्त देवस्थान अध्यक्ष मंगेश घाडी, बाळासाहेब कोलते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व दत्तभक्त उपस्थित होते.