*कोकण Express*
*पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जखमी शिवसैनिक संतोष परब यांची विचारपूस..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो, या हल्ल्याची माहिती मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. जे कोण हल्लेखोर आहेत त्यांना तात्काळ शोधून काढून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
काहीवेळा नंतर ते कणकवली येथील रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर जखमी संतोष परब यांची भेट घेऊन विचारपूस करत घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यात नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे त्यांच्याशी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत काही सूचना केल्या.