*कोकण Express*
*हल्ल्याच्या घटनेनंतर कणकवलीत पोलीस बंदोबस्त वाढवला…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक मजूर संस्था संचालक, करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गजबजलेल्या नरडवे रोडवर रेल्वेस्टेशन नजीक हा हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
नरडवे नाका श्रीधर नाईक चौकात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस निरीक्षक नितीन बगाडे तसेच कणकवली विभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडून हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष परब यांचा जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे.