*कोकण Express*
*“त्या” हल्ल्याचे सूत्रधार आ. नितेश राणे, गोट्या सावंत ; सतीश सावंत यांचा आरोप*
*दहशतवादाने जिल्हा बँक जिंकण्याचा डाव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा बँक निवडणुकीतील माझे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचे सांगत या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला.
जिल्हा बँक निवडणुक दहशतवादाने जिंकण्याचा राणेंचा डाव असल्याचंही सावंत म्हणाले. 2015 साली राणेंची साथ सोडणाऱ्या राजन तेलींवर अशाच प्रकारे सावंतवाडी रेस्ट हाऊसमध्ये झाला होता. सहकार क्षेत्रात खुनी हल्ले करून दशतवादाने जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा राणेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जनता राणेंच्या या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले.