*कोकण Express*
*ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत राजकीय वातावरण तापले*
*आम. वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिकांची उपजिल्हा रुग्णालयात धाव*
*डीवायएसपी, एलसीबी पीआय, स्थानिक पोलीस अधिकारीही उपजिल्हा रुग्णालयात दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११:००वाजता सतीश सावंत समर्थक संतोष परब यांच्या छातीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तालुक्यातील शिवसैनिकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आम. वैभव नाईक यांनीसुद्धा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत परब यांच्या तब्येतीची चौकशी केली.
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने शिवसेनेत प्रचंड चीड निर्माण झाली असून शिवसैनिक हल्लेखोरांच्या इनोव्हा गाडीच्या शोधात निघाले आहेत. दरम्यान पोलीस यंत्रणेने या हल्ल्याची त्वरित दखल घेतली असून डीवायएसपी डॉ कटेकर, एलसीबी पोलीस निरीक्षक धनावडे, कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत