*कोकण Express*
*माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संघटनेसोबत सभेचे आयोजन करावे*
*कणकवली तालुका शिक्षक भारतीच्या सभेत सभासदांकडून मागणी*
*कासार्डे ः संजय भोसले*
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे ता.कणकवली येथे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती शाखा कणकवलीची सभा तालुका अध्यक्ष प्रसाद मसूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमिक संघटना पदाधिकारी यांच्यासोबत सभेचे आयोजन केलेले नसल्याने अनेक शिक्षकांची कामे प्रलंबित राहिल्याने सभासदामधून या कार्यपद्धती बद्दल नाराजी व्यक्त करीत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेबरोबर सभेचे आयोजन करावे असा ठराव मंजूर करण्यात आला. शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटना पत्राद्वारे मागणी करणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष प्रसाद मसूरकर यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
यासभेला कासार्डे विद्यालयाचे पर्यवेक्षक एन्.सी.कुचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय सभेत सभासद नोंदणी,तालुका दौरा नियोजन,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी सावित्रीबाई फातिमा कॅशलेस मेडिक्लेम पाॅलिसी सविस्तर माहिती, कणकवली तालुका स्नेहमेळावा नियोजनावर चर्चा,शिक्षकांच्या विविध समस्यावर चर्चा तसेच तालुक्यातील शाळा भेटी यासारख्या अनेक विषयांवर सविस्तर आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष प्रसाद मसूरकर ,सचिव संतोष राऊत ,एन.सी.कुचेकर, जिल्हा पदाधिकारी दत्तात्रय मारकड आदींनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले. तालुका पदाधिकारी व सभासद श्री.अवधूत घूले ,श्री.महादेव मोटे ,श्री. रामदास भिसे व सौ.सविता जाधव आदींनी यासभेत विशेष मुद्दे मांडले.
शेवटी जिल्हा पदाधिकारी दत्तात्रय मारकड यांनी आभार मानून सभेची सांगता केली.

