*कोकण Express*
*बिपीन रावत यांना शेतक-यांनी वाहीली श्रध्दांजली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भारताचे पहिले सरसेनाध्यक्ष दिगवंत जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी व तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या ११ संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बांदा शाखेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संचालक मंगेश गांवकर,माजी सैनिक मोहन सावंत,तुकाराम सावंत, गुरुनाथ मोर्ये, धोंडु ताटे, निलेश गावडे, रमेश परब, पांडुरंग नाईक, शाखा व्यवस्थापक अमोल वारंग व कर्मचारी यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना सैनिक पतसंस्थेचे संचालक मंगेश गांवकर म्हणाले, जनरल रावत यांनी आपल्या हाती सैन्य दलाची सुत्रे घेतल्यानंतर शस्त्र सामुग्री अद्यायावत झालीच पाहिजे यावर भर दिला.आज आपल्या सैन्याकडे जी प्रगत शस्त्रात्र यंत्रणा आहे त्यांचे श्रेय हे जनरल बिपीन रावत यांना जाते. त्यांच्या जाण्याने देशाचे कधीही भरुन न येणारे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व प्रथम जनरल बिपीन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. जनरल रावत हे लढवय्ये सैनिक होते. त्यांची धास्ती पाकिस्तान व चीनने घेतली होती. पाकिस्तान पुरस्कृत दहशत वाद्यांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख होत. दहशवादी तळावर जो सर्जिक स्टाईल करण्यात आला त्यामध्ये रावत यांची भूमिका महत्त्वाची होती, असे गावकर यांनी यावेळी सांगितले.