वैभववाडीत भाजपा मंडल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

वैभववाडीत भाजपा मंडल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

*कोकण Express*

*वैभववाडीत भाजपा मंडल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

भाजपा प्रदेश कार्यालय यांच्या विद्यमाने दि. 29 व 30 नोव्हेंबर या कालावधीत वैभववाडी भाजपा मंडल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर एडगांव येथील सुमित्रा मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. या शिबिराला भाजपा वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबिराला जिल्हा व तालुका कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, विविध मोर्चाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सरपंच, गावातील प्रमुख पदाधिकारी, भाजपा निष्ठावंत यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडल अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!