समाज घडविण्याचे कार्य प्राथमिक शाळेतून; एन. सी. कुचेकर

समाज घडविण्याचे कार्य प्राथमिक शाळेतून; एन. सी. कुचेकर

*कोकण Express*

*समाज घडविण्याचे कार्य प्राथमिक शाळेतून; एन. सी. कुचेकर*

*देवगड,कणकवली, वैभववाडी या तालुक्यांचे तीन दिवसीय टॅग मिटींग कासार्डेत संपन्न*

*कासार्डे ः संजय भोसले*

समाज घडविण्याचे ख-या अर्थाने कार्य प्राथमिक शाळेतून होत असून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले प्रायमरी शिक्षक हे कार्य अविरतपणे करीत असल्याचे गौरवोद्गार कासार्डे विद्यालयाचे पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर यांनी काढले. कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तीन दिवसाची टॅग कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून चेतन बोडेकर, नितीन पाटील यांनी उत्तम कामगिरी पार पाडली तर प्रणाली पाळेकर यांनी केंद्र व्यवस्थापिका म्हणून कार्य केले. समारोप सोहळ्याला श्रीम. तौसिकर, श्रीम. कोंडूसकर व रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टॅग मिटींगचे प्रशिक्षक सचिन यादव आदींनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रफुल्ल जाधव व नारायण झोरे यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक एन. सी.कुचेकर, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक, डी. जे. मारकड, तज्ञ मार्गदर्शक नितीन पाटील, सचिन बोडेकर, व्यवस्थापिका प्रणाली पाळेकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन कासार्डे शिक्षण संस्थेचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व प्राचार्य एम. डी. खाड्ये यांच्या उपस्थितीत झाले. समारोप कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक नितीन पाटील व चेतन बोडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने प्रशिक्षण यशस्वी होण्यास मदत झाल्याची भावना व्यक्त केली. तर अनेक प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याचे आवर्जून सांगितले. शेवटी प्रफुल्ल जाधव यांनी आभार मानून या तीन दिवसीय कार्यशाळेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!