*कोकण Express*
*जे अजिंक्य ते जिंकण्याची साहसी वृती आणि अज्ञात क्षेत्राचे संशोधन करण्याचीजिज्ञासा याच गिर्यारोहकांच्या प्रेरक शक्ती असतात*
*कासार्डे ः संजय भोसले*
आंतरराष्ट्रीय पर्वतदिनाचे निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या कार्यक्रमात संघटनेचे उपाध्यक्ष डाॅ. कमलेश चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले की आजकालच्या तरूण पिढीची मोबाईल पुढे जाऊन मैदानी खेळांची आवड फार दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे गिर्यारोहण सारखा दुर्लक्षित खेळ या मुलांच्या खिजगणतीत असेल असे मला वाटले नव्हते परंतु या छोट्या मुलांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. कसाल न्यु इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ,पर्वत पूजन,प्रतिज्ञा,गिर्यारोहन प्रात्यक्षिके,निबंध स्पर्धा आदींची रेलचेल होती.
जे अजिंक्य दिसते ते जिंकण्याची मानवाची नैसर्गिक इच्छा, त्याची साहसी वृत्ती, अज्ञात क्षेत्राचे संशोधन करण्याची त्याची जिज्ञासा या गिर्यारोहणाच्या प्रेरक शक्ती आहेत. निसर्गाचे उदात्त दर्शन व व्यावहारिक रुक्ष जीवनातून होणारी सुटका यांमुळेही लोकांना गिर्यारोहणाचे आकर्षण वाटते. माणसाच्या महत्त्वाकांक्षेला आव्हान देणारा एक क्रीडाप्रकार म्हणून गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. स्वतःच्याच सामर्थ्यावर, सहनशीलतेवर व निर्णयबुद्धीवर अवलंबून निसर्गानेच दिलेल्या कार्यक्षेत्रात निसर्ग हाच प्रतिस्पर्धी म्हणून विरोधात उभा ठाकतो हीच यशाची खरी मजा आहे. एकूण मानवजात विरुद्ध निसर्ग असा हा अद्वितीय व चित्तथरारक खेळ आहे. या खेळात मनोरंजनाबरोबर आपले सर्वसामर्थ्य पणास लावण्याची जिद्द पुरी करता येते; इतकेच नव्हे, तर उंच पर्वतक्षेत्रात शास्त्रीय संशोधन व अभ्यास करणे यामुळे शक्य होते.

गिर्यारोहणासारखा तणा-मनाचा सर्वांगिन विकास घडवणार्या खेळाची निवड करणे आज काळाची गरज बनलेली आहे. मोबाईल पासून परत मैदानापर्यंत मुलांचा प्रवास या माध्यमातूनच शक्य होईल.
यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रकाश नारकर, खजिनदार श्री. जगन्नाथ राऊळ , प्रमुख अतिथी DFO .सुभाष पुराणिक, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था सचिव .यशवंत परब, अवधूत मालणकर, मुख्याध्यापक गुरूदास कुसगांवकर श्री.प्रकाश म्हापणकर, श्री.महेंद्रकर . . हर्षद नाडकर्णीं, श्री.संदिप गोळवणकर कल्पेश म्हस्के.आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार माणून कार्यक्रमाची सांगता झाली.

