दिपक बेलवलकर कणकवली नगरपंचायतचे “ब्रँड ॲम्बेसिडर”

दिपक बेलवलकर कणकवली नगरपंचायतचे “ब्रँड ॲम्बेसिडर”

*कोकण Express*

*दिपक बेलवलकर कणकवली नगरपंचायतचे “ब्रँड ॲम्बेसिडर”*

*नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीबद्दल सत्कार*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

स्वच्छ सर्वेक्षण २०२२मध्ये कणकवली नगरपंचायत अंतर्गत “ब्रँड ॲम्बेसिडर” म्हणून कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेलवलकर यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांनी अभिनंदन केले आहे. कणकवली शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत विविध उपक्रम राबविणे व जनसामान्यांमध्ये स्वच्छते बद्दल जागृती करून कणकवली शहर देशात, राज्यात अव्वल स्थानी आणण्याकरिता नगरपंचायत च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व ब्रँड ॲम्बेसिडर दिपक बेलवलकर यांनी सांगितले. या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, प्रतिश खैरे, सतीश कांबळे, मनोज धुमाळे, अमोल भोगले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!